उत्तर प्रदेशमधील एका नवविवाहित तरुणाला व्हायग्राचे डोस अधिक प्रमाणात घेतल्याने रुग्णालयात दाखल करण्याचा विचित्र प्रकार समोर आलाय. सामान्यपणे इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या लैंगिक आजारांशीवरील उपचारासाठी या गोळीचा वापर केला जातो. तसेच पल्मोनरी आर्टीरल हायपरटेन्शनवरील उपाचारासाठीही या औषधाचा वापर केला जातो.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी वेळीच उपचार करुन या व्यक्तीला वाचवले. मात्र आता या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याला कायमस्वरुपाच्या काही आरोग्यविषयक समस्यांचा सामाना करावा लागणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या या वक्तीने मित्राच्या सल्ल्याने व्हायग्राचे सेवन सुरु केले. औषधं कोणती घ्यावीत कोणती नाही हे सुचवण्याचं वैद्यकीय ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानेच औषधं घेतली पाहिजेत. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन या तरुणाने जास्तप्रमाणात व्हायग्रा घेण्यास सुरुवात केली. मित्राने सुचवलेल्या प्रमाणापेक्षाही अधिक प्रमाणात तो औषध घेऊ लागला. तो रोज २०० एमजी क्षमतेची गोळी घ्यायचा. हे प्रमाणा सामान्यपणे प्रिस्क्राइब केल्या जाणाऱ्या मर्यादेच्या चौपट आहे.

या औषधाच्या अतिसेवनामुळे तरुणाला लैंगिक समस्या निर्माण झाल्या. तसेच त्याच्या पत्नीला या औषधाच्या सेवनासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ती संतापून माहेरी निघून गेली. मात्र तिच्या सासरच्यांनी तिला पुन्हा बोलावून घेतलं. मात्र आता या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याची पत्नी पुन्हा तिच्या माहेर राहण्यासाठी गेलीय, असं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

डॉक्टरांनी या तरुणाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रीया केली. मात्र यानंतर आता आयुष्यभर त्याला लैंगिक समस्येचा सामना करावा लागणार आहे. डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती देताना, या तरुणाच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम झाला असून त्याला आपत्य होऊ शकते. मात्र यापुढे त्याला वरचेवर लैंगिक समस्या होण्याची शक्यता फेटाळता येत नाही, असं डॉक्टर म्हणाले. शस्त्रक्रीयेमुळे गुप्तांगाजवळ आलेला फुगवटा लक्षात घेता आता त्याला कपडे घालतानाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर यामुळे परिणाम होणार आहे, असा इशारा डॉक्टारांनी दिलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारच्या समस्या टाळण्यासाठी नेहमीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेतली पाहिजे. आपल्या शरीरावर अनेक लहानमोठ्या गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळेच अगदी साधीसाधी औषधं घेतानाही डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदायचं ठरतं.