Dolphin Cuddling A Woman Video Viral : समुद्रात अनके प्रकारच्या मासे आढळतात. शार्कसारखे मासे माणसांवर हल्लाही करतात. तर काही मासे माणसांना जीव लावतात. या माशांमध्ये डॉल्फीन माणसांचा सर्वात आवडता मासा आहे. कारण डॉल्फीन माशाला माणसांचे हावभाव आणि त्यांच्या मनातील भावना ओळखता येतात. कारण डॉल्फीनचा असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डॉल्फीनला मिठी मारून त्याच्यासोबत मस्ती करण्यासाठी एका तरुणीने डायविंग करून खोल समुद्राचं तळ गाठलं. त्यानंतर डॉल्फीन माशांनी आपुलकी दाखवत त्या तरुणीचं स्वागत केलं. डॉल्फीन आणि तरुणीमध्ये असलेला जबरदस्त जिव्हाळा या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर इतका गाजला आहे की, या व्हिडीओला आतापर्यंत ११ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

नक्की वाचा – Video: ट्रॅफिक झाल्यामुळे पठ्ठ्याने सायरनचा केला गैरवापर, पोलिसांनी रुग्णवाहिका तपासली अन्…

इथे पाहा व्हिडीओ

समुद्राच्या पाण्यात डॉल्फीन मासे माणसांसोबत खेळत असतात. डॉल्फीनचे असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. पण निकोल बेल्लो नावाच्या डायव्हरने डॉल्फीनसोबत शेअर केलेलं प्रेम इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, डायविंग करून समुद्राच्या खोलात जाते. त्यानंतर डॉल्फीन माशांना मिठी मारून ती त्यांच्यासोबत मस्ती करते. त्यांना प्रेमाने कुरवाळते. डॉल्फीनही त्या तरुणीला प्रेमाची साद घालत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करत निकोल म्हणाली, मला असा अनुभव याआधी कधीच आला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉल्फीनचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद या व्हिडीओला मिळाला आहे. १ कोटी १० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसंच नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, खूप छान, आयुष्यभराचं स्वप्न. दुसरा नेटकरी म्हणाला, प्राण्यांना कोण पसंत करतं, हे त्यांना कळतं. त्यामुळे ते अशा व्यक्तींच्या जवळ येतात. तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, डॉल्फीन नक्कीच हसत असेल, किती सुंदर दृष्य आहे.