Greatest Of All Time (GOAT) Train Video Viral : ट्रेनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विंडो सीटवरून किंवा गर्दीमुळे झालेल्या त्रासाने प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. काही प्रवासी विनातिकिट प्रवास करतात आणि टीसी समोर दिसला की पळ काढतात. पण ट्वीटरवर नुकतच व्हायरल झालेल्या व्हिडीओनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण एका वृद्ध महिलेनं तिच्यासोबत चक्क बकरीला ट्रेनमध्ये चढवले आणि त्या बकरीसाठी एक तिकिटही खरेदी केली. बकरीसाठी काढलेली तिकिट पाहिल्यावर तिकिट तपासणीसही चक्रावून गेला. आजीचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आजीच्या प्रामाणिकपणावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षावही केला आहे.

आजी आणि बकरीचा हा व्हिडीओ @DPrashantNair नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलय, एका महिलेनं बकरीसोबत ट्रेनमध्ये प्रवास केला आणि त्या बकरीसाठी तिकिटही खरेदी केलं. तिकिट तपासणीला बकरीसाठी काढलेलं तिकिट दाखवत या महिलेनं प्रामाणिकपणाचं उत्तम दर्शन घडवलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, टीसी प्रवासी महिलेला तिकिट तिचं आणि बकरीसाठी काढलेल्या तिकिटाबाबत विचारतो. त्यावेळी आजीबाई बिंधास्तपणे दोन्ही तिकिट टीसीला दाखवते. आजीसोबत आणखी एक प्रवासी असल्याने तिन्ही तिकिट टीसी तपासतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे पाहा आजीचा आणि बकरीचा ट्रेनमधील भन्नाट व्हिडीओ

आजी त्या टीसीला हसत हसत सांगते, हो आम्ही बकरीसाठीही तिकिट काढलं आहे. बकरी आणि आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, गोट नाही..तर ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, त्या महिलेसाठी बकरी फक्त एक प्राणी नाही. तर तिच्या कुटुंबातील एक सदस्य आहे.