Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या मेट्रोमध्ये काहीना काही घटना घडत असतात. आता देखील दिल्ली मेट्रोमधला एक जबरदस्त भांडाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये महिला प्रवाशी एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत आहे. मेट्रो ट्रेन आणि सकाळची वेळ म्हटल्यावर त्यात मोठी गर्दी जमा होते. सर्वच व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या दिशेने धाव घेतात. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतो. यामध्ये प्रवाशांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र गर्दीच्यावेळी धक्का लागल्यावर अनेक प्रवाशी आक्रमक होतात आणि भांडण करण्यास सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोत सातत्याने अतरंगी घडना घडतात. अशात आता काही महिला प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मेट्रोमध्ये दोन महिला हात लागला म्हणून भांडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये हाणामारी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रोचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता मेट्रोमध्ये दोन महिलांमधील बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला, त्याचे रूपांतर शिवीगाळात झाले.

या व्हिडीओत सुरुवातीला दोघी इंग्रजीत एकमेकांशी भांडताना दिसतात, पण काही वेळातच वाद हिंदी भाषेत वळतो. ज्यामध्ये महिला एकमेकांना तू-तू-मैं-मैं करत आहेत. एकमेकींना हात लागत असल्यामुळे हा वाद सुरु झाला असून कुणीच एकत नाहीये. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. दोघीही एकमेकींना ओरडताना दिसत आहे. मेट्रोतील इतर प्रवासी हे दृश्य शांतपणे पाहत होते. पण त्यापैकी कोणालाही त्यांना थांबवण्याची इच्छा झाली नाही. त्याऐवजी काही प्रवाशांनी हा वाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या वागणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून टीका करत आहेत, एकानं म्हंटलंय, “या महिला कधी सुधारणार काय माहिती?” तर आणखी एकानं “अवघड आहे बायकांचं” असं म्हंटलंय