सध्या अन्न पदार्थांबरोबर विचित्र प्रयोग होत असल्याचे व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. मागे गुलाबजामून आणि ब्रेडच्या फ्यूजनपासून गुलाबजामून बर्गर तयार करण्यात आला होता. या पदार्थाविरोधात नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आता अशाच प्रकारे एक विचित्र आणि अनोखा असा पदार्थ खवयांसाठी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, यात तुमच्या आवडत्या चॉकलेटचा देखील वापर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये एक महिला चॉकलेट पकोडा ( Chocolate Pakoda ) बनवत आहे. महिला चॉकलेटची पापडी बेसणातून काढून थेट त्यास फ्राय करते. हा पदार्थ पाहून तुम्ही हैराण झाले असाल. चॉकलेटचा केक, लाडू तुम्ही नक्कीच बघितला असेल, मात्र चॉकलेटसोबत केलेला हा प्रयोग कदाचित तुम्हीही पहिल्यांदाच पाहिला असेल.

(तेव्हा आम्हालाही असाच आनंद होतो.. झोमॅटोने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, तुम्हीही पोट धरून हसाल)

आरजे रोहन नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला १ लाख व्हूज मिळाले आहेत. ब्रेड पकोडा, भजे, आलूबोंडा याने भारतीय खाद्य पदार्थांच्या यादीत विशेष स्थान निर्माण केले आहे. अनेकांचा तर हा नेहमीचा नाष्टा झालेला आहे. त्यामुळे आता या प्रसिद्ध नाष्ट्यांमध्ये चॉकलेट पकोडा लोकप्रियतेसह आपले स्थान निर्माण करू शकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आयफोन पकोडा कर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चॉकलेट पकोड्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजरने कंटाळून म्हटले, पुढच्या वेळी आयफोन पकोडा कर. तर एकाने याच्यापेक्षा वाईट अजून काय होऊ शकते, अशी प्रतिक्रिया दिली. तर एका युजरने पकोड्यासोबत छळ होत असल्याची खंत व्यक्त केली. तर हे पदार्थ पाहून बरे आहे मी आंधळा आहे, असे म्हणत एकाने दुख व्यक्त केले आहे.