Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा असे फोटो व व्हिडीओ व्हायरल होतात की जे समजून घेण्यासाठी आपल्याला बुद्धीचा कस लावायला लागतो. ऑप्टिकल इल्युजन म्हणून एक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला चित्रांमधून एखादी वस्तू शोधायला सांगितली जाते किंवा दोन फोटोंमधील फरक ओळखायला सांगितला जातो. असेच काही व्हिडीओ सुद्धा ट्रेंड होत असतात ज्यात प्रथमदर्शनी आपल्याला काहीतरी भलतेच दिसते पण नीट निरखून पाहिल्यावर नेमका काय प्रकार आहे हे लक्षात येतं. असाच एक व्हिडीओ आज आपण पाहणार आहोत ज्यात एक महिला चक्क आपल्या नवऱ्याला बॉक्समध्ये उचलून पळून जाताना दिसत आहे.

आपण पाहू शकता की एका दगडी जिन्यावरून एक बाई धावताना दिसत आहे जिच्या हातात एक पुठ्ठ्याच्या बॉक्स आहे. या बॉक्समध्ये सामानाच्या ऐवजी चक्क एक माणूस बसलेला दिसतोय. ही बाई त्या माणसाला बॉक्समध्ये भरून पळून जात असते.

नवऱ्याला बॉक्समध्ये भरलं आणि पळत सुटली

हे ही वाचा<< ३ सिंहिणींसमोर अडकला ‘तो’; जीव वाचवायची धडपड अन् तेवढ्यात.. Viral Video मध्ये पाहा थरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही व्हिडीओ पाहिलात? तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का जेव्हा या महिलेच्या चेहऱ्यावर कॅमेरा फोकस होतो तर तो चेहरा खऱ्या बाईचा नसून एक पुतळा आहे. म्हणजेच या माणसाने एकट्याने हा प्रॅन्क केला आहे. ज्यात त्या बॉक्समध्ये त्याचा चेहरा व अर्ध शरीर असून पाय त्या महिलेच्या कपड्यांनी झाकलेले आहेत. खरंच हातचलाखी म्हणावी ती हीच अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर अनेकजण देत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर २ लाखाहून अधिक व्ह्यूज व तीन हजाराचं वर लाईक्स मिळाल्या आहेत.