सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज प्रसिद्ध होत असतात. काही व्हिडीओ बघून आपण आश्चर्यचकित होतो. नुकतेच ऑस्ट्रेलियात एका सामन्यादरम्यान मैदानावर सॉफ्ट बॉलचा खेळाडू आपल्या मैत्रिणीला दुखापतीच्या बहाण्याने प्रपोज करताना दिसला. याशिवाय एक माणूस डिलिव्हरी मॅन असल्याची बतावणी करून नोकरी शोधताना दिसला, जो नोकरी मिळवण्यासाठी डोनट्सच्या डब्यात आपला बायोडाटा सर्वांना पाठवत होता.

आता, एका वृत्तवाहिनीवरील लाइव्ह डिबेट शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पॅनेलच्या सदस्यांनी, बोलण्याची संधी दिली नाही म्हणून, एक हटके गोष्ट केली ज्यामुळे तुम्हाला नक्कीच हसू येईल.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाइव्ह डिबेट दरम्यान एका महिला पॅनेलला बोलण्याची संधी दिली जात नव्हती, तेव्हा ती मध्येच उभी राहून नाचू लागली आणि विचित्र चेहरेही करू लागली. जेणेकरून लोकांचे लक्ष तिच्याकडे जाईल.

(हे ही वाचा: २००० वर्षांपूर्वी मेटल धातूसह झाली होती कवटीची शस्त्रक्रिया, प्रगत वैद्यकशास्त्राचा सर्वात जुना पुरावा सापडला)

(हे ही वाचा: Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठीचा केलेला हा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॅनेलचा सदस्य बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिला चर्चेत सहभागी न्यूज अँकर आणि इतर पाहुण्यांनी थांबवले, त्यामुळे महिला पाहुण्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरला नाही, म्हणून तिने थेट असं केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, लोक या व्हिडीओवर मजेशीर कमेंटही करत आहेत.