scorecardresearch

Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठीचा केलेला हा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

हा व्हिडीओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. ‘माझा भारत महान आहे… प्रॉमिसिंग इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे.

Funny Winter Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @rupin1992 / Twitter)

हिवाळ्यातल्या कडक थंडीमध्ये नुसता आंघोळ करण्याचा विचारही करू वाटत नाही. उन्हाळ्यात आंघोळ करणे जितके सोपे आहे तितकेच हिवाळ्यात ते अवघड आहे. या कारणास्तव काही लोक थंडीमुळे रोज अंघोळही करत नाहीत. दरम्यान एका व्यक्तीचा एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अंघोळ करताना थंडीपासून वाचण्यासाठी काय जुगाड करतो ते पाहून हसायला येते.

घराच्या बाथरुममध्ये आंघोळ करण वेगळ आणि तलावात किंवा नदीत आंघोळ करण वेगळ. नदीतलं थंड पाणी अंगावर पडताच काहीच समजत नाही. दरम्यान एका व्यक्तीला तलावात उघड्यावर आंघोळ करावी लागली तेव्हा त्याने असा काही जुगाड केला की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

(हे ही वाचा: २००० वर्षांपूर्वी मेटल धातूसह झाली होती कवटीची शस्त्रक्रिया, प्रगत वैद्यकशास्त्राचा सर्वात जुना पुरावा सापडला)

हटके जुगाड

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माणूस नदी किंवा तलावात अंघोळ करताना दिसत आहे. तिथे, थंडीटाळण्यासाठी, त्याने आतमध्ये तवा किंवा अन्य भांड्यात काहीतरी पेटवले आहे. पाण्यातच त्याच्यासमोर ते फेटलेलं दिसून येत आहे. जितक्या वेळा तो पाण्यात डुबकी मारतो तितक्या वेळा तो बाहेर येऊन आगीसमोर शेक घेतो. थंड पाण्यामुळे थरथर होत असलेल्या आपल्या शरीराला गरम करतो. या व्यक्तीचा हा जुगाड आणि त्याचे एक्सप्रेशन पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

IPS अधिकाऱ्यांनी पोस्ट केला व्हिडीओ

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ‘माझा भारत महान आहे… प्रॉमिसिंग इंडिया’ असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. व्हिडीओमध्ये लिहलेले दिसते की, भारतात इतके होनहार लोक का जन्माला येतात?

(हे ही वाचा: एलियन होण्यासाठी केल्या १०० हून अधिक शस्त्रक्रिया; केले लाखो रुपये खर्च)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

अवघ्या १५ सेकंदांच्या या व्हिडीओ आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. नेटीझन्सला हा व्हिडीओ खूप आवडला आहे असं दिसून येत. या व्यक्तीच्या जुगाडवर सर्व यूजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले “जुगाडमध्ये भारतीयांना कोणीही हरवू शकत नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video you will not be able to control your laugh when you see this jugad to save from the cold ttg

ताज्या बातम्या