नवऱ्याला खुश ठेवायला तिला ‘अशी’ बाई हवीये.. अजब Vacancy ची गजब चर्चा

आपण कामामुळे व्यस्थ असल्याने काही वर्षापासून नवऱ्याला शारीरिक सुख देऊ शकत नाही याचे वाईट वाटते असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.

नवऱ्याला खुश ठेवायला तिला ‘अशी’ बाई हवीये.. अजब Vacancy ची गजब चर्चा
नवऱ्याला खुश ठेवायला तिला 'अशी' बाई हवीये (फोटो : संग्रहित)

एक बाई आपलं सगळं काही माफ करू शकते पण आपल्या पतीच्या आयुष्यात दुसरी स्त्री नाही हे वाक्य आपण आजवर अनेक सिनेमांमध्ये नायिकांच्या तोंडी ऐकलं असेल. पण अलीकडे एका थायलँड च्या माणसाचं नशीब भलतंच जोरावर आलं आहे, इतकं की चक्क त्याची पत्नीच त्याच्या आनंदासाठी ‘बाई’ शोधतेय, ते पण एखादी नव्हे तर चक्क तीन- तीन बायका हव्या आहेत असं सांगत तिने सोशल मीडियावर जाहिरात केली आहे. पत्तहीमा चमनन (Pattheema Chamnan) असे या महिलेचे नाव असून तिने या गजब नोकरीसाठी पात्रता निकष सुद्धा सांगितले आहेत.

पत्तहीमा या ४४ वर्षीय असून मूळ बँगकॉकच्या रहिवाशी आहेत, त्यांनी अलीकडेच एक टिक टॉक व्हिडीओ बनवून या अजब नोकरीसाठी जाहिरात केली आहे. आपण कामामुळे व्यस्थ असल्याने काही वर्षापासून नवऱ्याला शारीरिक सुख देऊ शकत नाही याचे वाईट वाटते म्हणूनच आपल्या पतीला खुश ठेवू शकेल अशी बाई आपण शोधतोय असे त्यांनी म्हंटले आहे.

लग्नाच्या ५४ वर्षानंतर जोडप्याला मिळाली गोड बातमी; विज्ञानाचा चमत्कार ठरला यशस्वी

नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी अशी हवी बाई..

ही महिला तरुण, सिंगल व निदान ३० ते ३५ या वयोगटातील हवी , महिलेचे किमान डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण झालेले असावे. अर्ज करण्याआधी या महिलेने आपल्याला एचआयव्ही किंवा अन्य रोग नसल्याचे मेडिकल प्रमाणपत्र सादर करावे लागेल. महिलेचे लग्न झालेले नसावे किंवा सिंगल पॅरेंट्सला सुद्धा अर्ज करता येणार नाही. महिला दिसायला सुंदर व टापटीप हवी.

दरम्यान पत्तहीमा यांनी असेही सांगितले की, “या दुसऱ्या बाईचे मुख्य काम हे त्यांच्या पतीला खुश ठेवणे हेच असेल. तो एक पुरुष आहे आणि त्याच्या गरजा आहेत, अजूनही तो शारीरिक दृष्ट्या ऍक्टिव्ह असल्याने त्याच्यासोबत राहून त्याच्या शारीरिक गरजा भागवण्याचे व त्याला खुश ठेवण्याचे काम या महिलेला करायचे आहे.” या कामासाठी पत्तहीमा यांनी ३४२ युरो पगार ऑफर केला आहे.

‘या’ बेडकाची Idea वापरली असती तर.. Titanic चा जॅक वाचला असता! हा तुफान Viral Video पहाच

पत्तहीमा व त्यांचे पती हे दोघे मिळून एक व्यवसाय करतात, तसेच पत्तहीमा यांना क्रोनिक आजार आहेत ज्यामुळे त्यांना अनेकदा तणाव असतो म्हणूनच त्या पतीला खुश ठेवू शकत नाहीत असे त्यांचे मत आहे. पत्तहीमा यांच्या पतीला सुरुवातीला याविषयी कल्पना नव्हती मात्र जेव्हा त्यांना अचानक या व्हायरल व्हिडीओ बाबत समजले तेव्हा त्यांनी सुद्धा यावर काही आक्षेप घेतला नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women wants to hire mistress for husbands physical needs video went viral online svs

Next Story
थेट अंतराळातून भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; Viral Video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी