ऑफिसचे वातावरण हसते- खेळते आणि पॉझिटिव्ह ठेवण्याचे काम बॉसच्या हातात असते. बॉस कर्मचाऱ्यांसोबत जर आपुलकीने, समजूतदारपणे वागला तर कर्मचारीही कामात त्यांचे १०० टक्के देण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. बॉस जर चांगला असेल तर कर्मचारीही अनेक वर्षे त्यासोबत काम करण्यास तयार असतात. म्हणून जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी सोडतो तेव्हा अनेकदा तो कंपनी नाही तर बॉसला कंटाळून नोकरी सोडतो असे म्हटले जाते. अशाच एका टॉक्सिक बॉसचे ताजे उदाहरण एका सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळत आहे. एका खडूस बॉसने कर्मचाऱ्यांसाठी कडक फर्मान जारी केले आहे. यात बॉसने कर्मचाऱ्यांना काम म्हणजे मज्जा- मस्ती नाही, असे कठोर शब्दात सुनावत कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी न बोलण्याची सक्ती केली आहे. यामुळे हा खडूस बॉस आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

डेली मेल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर ‘Mildly Infuriating’ पेजवर काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, जो खूप व्हायरल झाला होता. हा फोटो एका बॉसने जारी केलेल्या नोटीसचा आहे. ज्यात बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कशाप्रकारे वागले पाहिजे याचे नियम सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर अनेक बंधने घातली आहेत.

१२ सर्जरी, १ कोटी ८० लाखांचा खर्च; प्रसिद्ध सेलिब्रिटीसारखे दिसण्याच्या नादात गमावला जीव

बॉसने ऑफिसच्या भिंतीवर चिटकवले फर्मान

व्हायरल पोस्टमधील बॉसने नोटीसमध्ये लिहिले की, “सर्व कर्मचाऱ्यांनी इथे लक्ष द्यावे, कामाचा अर्थ मज्जा-मस्ती नाही. हे तुमचे काम आहे, त्यामुळे तुमच्या कामाचा वेळ कामाव्यतिरिक्त इतर काही गोष्टींमध्ये वाया घालवू नका. कामाच्यादरम्यान मैत्री करू नका नाही ती जपू नका. एकमेकांना फोन नंबर्स द्यायचे असतील किंवा ऑफिसच्या मित्रांसोबत फिरायचे असल्यास ते कामानंतर ठीक आहे, परंतु ऑफिसमध्ये नाही. ऑफिसमध्ये कोणताही कर्मचारी कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी बोलताना दिसला तर माझ्या नंबरवर फोन करून सांगा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सने बॉसवर केली टीका

ही पोस्ट वाचून युजर्सनी आता बॉसला टॉक्सिक म्हणून घोषित केले आहे. बॉस अशाप्रकारे फर्मान काढून कर्मचाऱ्यांवर अत्याचार करत आहे, असे अनेक युजर्सने म्हटले आहे. एका युजरने पोस्टवर कमेंट करत म्हटले की, जो कोणी त्या कंपनीत काम करत असेल त्याने ताबडतोब नोकरी सोडून द्यावी, कारण ही कंपनी खूप वाईट आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, तो ज्या कंपनीत काम करतो तेथे तो टीम लीडर आहे. तो आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्नॅक्स विकत घेतो आणि त्याच्या टीमला खूश करण्यासाठी सर्व काही करतो, व्हायरल झालेला मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे.अशाप्रकारे कर्मचाऱ्यांसाठी फर्मान जारी करणारी कंपनी नेमकी कोणती आहे हे अद्याप समोर आलेले नाही.