अलीकडेच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या, जगातील सर्वात वृद्ध श्वानाचे निधन झाले आहे. या श्वानाने सर्वात जास्त काळ जगण्याचा विक्रम केला होता. टेरियर असं या श्वानाचे नाव असून तिचा जन्म २८ मार्च २००० साली झाला होता. ३ ऑक्टरोबरला टेरियर आपले मालक बॉबी आणि ज्यूलीसह दक्षिण कॅरोलिना, युनायटेड स्टेट्स येथील त्यांच्या घरी गेली असता, तिथे तिचे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले.

टोबीकीथ नावाच्या २१ वर्षांच्या कुत्र्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात वयस्कर जिवंत कुत्रा म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील २२ वर्षीय टॉय फॉक्स टेरियर या पेबल्सने हा खिताब हिसकाला.

हा खिताब पटकावल्यानंतर टेरियरच्या मालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होता. ते म्हणाले, “आम्ही खरोखरच सन्मानित आहोत. पेबल्स प्रत्येक गोष्टीत आमच्याबरोबर आहे. आंच्यासह तिने अनेक चढ-उतार, चांगले आणि वाईट काळ पाहिले असून तिने नेहमीच आमच्या जीवनाला प्रकाशमान केले आहे.”

Scooby-Doo चे प्रसिद्ध पात्र ‘समलैंगिक’ असल्याचे दाखवताच चाहत्यांचा सोशल मीडियावर जल्लोष; पाहा प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार टेरियरने आपला दिवंगत जोडीदार रॉकीसह एकूण ३२ पिलांना जन्म दिला. २०१७ साली वयाच्या १६व्या वर्षी रॉकीचे निधन झाले. टेरियरच्या मालकांनी सांगितले, “टेरियरच्या दीर्घायुष्याचे कारण म्हणजे आम्ही तिला दिलेले प्रेम, तिची घेतलेली काळजी आणि पोषक अन्न हे आहे.” २०१२ साली टेरियरला मांजरीचे अन्न देण्यास सुरुवात करण्यात आली, कारण यामध्ये कुत्र्यांच्या अन्नापेक्षा अधिक प्रमाणात मांस-आधारित प्रथिने असतात.