गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये वेगवेगळ्या अतरंगी रेकॉर्डची नोंद होत असते. सगळ्यात मोठे केस, काही सेकंदात जास्तीत जास्त नारळ फोडणे, पत्त्यांची रचना करून प्रसिद्ध इमारतींची रचना करणे आदी अनेक खास गोष्टींच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येतात. तर आज सोशल मीडियावर गिनीज वर्ल्ड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एका १३ वर्षांच्या तरुणीने पाण्याखाली जाऊन जादू दाखवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ॲव्हरी इमर्सन फिशर (Avery Emerson Fisher ) असे या तरुणीचे नाव आहे. तसेच ती अमेरिकेची रहिवासी आहे. जेव्हा ती १० वर्षांची होती तेव्हा तिने स्कूबा डायव्हिंग करण्याचे प्रशिक्षण घेतले, तर आता वयाच्या १३ व्या वर्षी तिने या रेकॉर्डसाठी जादू दाखवण्याच्या ५० युक्त्या तयार केल्या. सॅन फ्रान्सिस्कोमधील खाडीच्या एक्वैरियममध्ये ही जादू तरुणीतर्फे दाखवण्यात आली आहे. तसेच यादरम्यान सहा जादूचे प्रकार अंतिम मोजणीतून अपात्र ठरवले गेले. १३ वर्षांच्या मुलीने पाण्याखाली कशाप्रकारे जादू दाखवली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओ बघा.
हेही वाचा…तरुण अन् टॉकिंग टॉयमध्ये रंगली अनोखी जुगलबंदी! Video एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
पाण्याखाली जादू दाखवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये कोरलं नाव :
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, तरुणी स्कूबा डायव्हिंगसाठी असणारा विशिष्ट पोशाख घालून पाण्याखाली उतरते. तसेच तिच्यासमोर दोन बॉक्स ठेवलेले असतात. फुगे, पत्ते, रंगीबेरंगी रुमाल, कापडाची जाळी आदी अनेक गोष्टींचा उपयोग करून ती विविध जादूचे प्रकार पाण्याखाली उभं राहून दाखवते. १३ वर्षांच्या तरुणीने तीन मिनिटांत पाण्याखाली एकूण ३८ जादूचे प्रकार करून दाखवले आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरले. प्रमाणपत्र देऊन या खास तरुणीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या अधिकृत @ guinnessworldrecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ॲव्हरी इमर्सन फिशरचे (यूएसए) अभिनंदन! जिने पाण्याखाली जाऊन काही जादूचे प्रकार करून दाखवले, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण तरुणीच्या कौशल्याचे कौतुक करताना तर पाण्यात उभं राहून दाखवण्यात आलेली जादू पाहून काही जण आश्चर्य व्यक्त करताना व्हिडीओखाली कमेंटमध्ये दिसून आले आहेत.