Longest Snake in the World: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचे धडधड वाढली आहे. कारण- यात दिसतोय जगातील सर्वांत लांब आणि घातक साप– मलेशियन किंग कोब्रा. काळसर पिवळसर अंगावर शहारे आणणारा हा साप जेव्हा आपल्या पूर्ण लांबीसह कॅमेऱ्यात कैद झाला, तेव्हा लोकांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काहींनी याला देवाचा चमत्कार म्हटलं, तर काहींनी धोकादायक इशारा! खरं तर, या व्हिडीओत काय आहे, हे पाहिल्यावर तुमचाही थरकाप होईल.
सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतोय तो म्हणजे मलेशियाई किंग कोब्रा – जो पृथ्वीवरील सर्वांत लांब आणि अत्यंत विषारी साप मानला जातो. हा व्हिडीओ पाहून लोक अक्षरशः दचकले आहेत.
मलेशियाई किंग कोब्रा ही अशी प्रजाती आहे, जी विशेषत: आपल्या भल्यामोठ्या लांबीसाठी ओळखली जाते. नर कोब्रा तब्बल १७ ते १८ फूट (सुमारे पाच मीटर) इतका लांब वाढतो. निसर्गातील ही राक्षसी उंची आणि त्यात भर म्हणून प्राणघातक विष – त्यामुळेच तो प्राणी जगतातील सर्वांत धक्कादायक आणि भयावह जीवांपैकी एक मानला जातो.
व्हिडीओने घाबरले लोक!
या व्हिडीओत एक मुलगा आपल्या हातात हा खूप मोठा किंग कोब्रा धरून उभा असल्याचं दिसतं. सापाचा काळसर-पिवळसर रंग, चमकदार कातडी, धूड फुगवून दिलेली फुत्काराची भीषण झलक पाहून लोक थबकले. खरं तर किंग कोब्रा फक्त आपल्या लांबीसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या बुद्धिमत्ता, मोठ्या प्रमाणात विष आणि शिकार करण्याच्या अनोख्या पद्धतीसाठीही तो जगभरात नावाजलेला आहे. हा साप इतर सापांनादेखील खातो. म्हणूनच त्याला ‘सापांचा राजा’ म्हटलं जातं.
त्याच्या विषाची ताकद इतकी भीषण आहे की, तो काही तासांत एका प्रौढ हत्तीचाही जीव घेऊ शकतो. तरीदेखील हा साप सहजासहजी माणसांवर हल्ला करीत नाही. माणूस धोका निर्माण केल्याशिवाय तो हल्ला चढवत नाही. एवढेच नाही, तर मादी किंग कोब्रा आपल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी घरटे बांधते, जे इतर कुठल्याही सापांमध्ये दिसत नाही. या काळात ती अत्यंत आक्रमक बनते.
१.५ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर @AMAZlNGNATURE या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. काही तासांतच या व्हिडीओला तब्बल १.५ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तब्बल ६५ हजार लोकांनी याला पसंती दिली असून, हजारो लोकांनी सापाची भयावहता आणि त्याची भलीमोठी लांबी यांवर चर्चा केली आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला – ‘हा निसर्गाचा चमत्कार आहे की निसर्गाने दिलेला इशारा?’
(डिस्क्लेमर: या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या दाव्याची सत्यता पुष्टी करत नाही.)