आजकाल जोडप्यांमध्ये ब्रेकअप होणं सामान्य झालं आहे, अनेकदा प्रेमाने सुरू झालेलं नातं भांडण होऊन संपतं. अशा ब्रेकअपच्या भांडणांशी संबंधित अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका जोडप्यांचे ब्रेकअप झालं आहे. अनेकदा काही जोडपी एकमेकांपासून लांब होताना त्यांच्यातील अनेक चांगल्या-वाईट गप्पाही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्या ऐकल्यानंतर आपणला हसू आवरणं कठीण होतं. सध्या अशाच एका जोडप्याचे व्हॉइस रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. जे ऐकून अनेकजण आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.

व्हायरल होत असलेल्या जोडप्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग @tanishaitaan नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये एका मुलीने ब्रेकअपदरम्यान तिच्या बॉयफ्रेंडचा शेवटचा व्हॉइस मेसेज शेअर केला आहे. जो ऐकून अनेकजण पोट धरुन हसत आहेत. या व्हॉइस मेसेजमध्ये मुलगा म्हणतो की, ऐक रोशनी, तू पहिल्याासून खूप हट्टी होतीस, पण जेव्हापासून तु तुझे केस रंगवले आहेस, तु डोकं आणखी बिघडलं आहे.

हेही वाचा- चिकन सँडविच खरेदी करायला गेला आणि लखपती बनला; क्षणात पालटलं व्यक्तीचं नशीब

“तुझ्या नादात मी भारत-पाकिस्तान मॅच चुकवली”

तो पुढे म्हणतो, “तुझ्या HNM च्या नादात मी भारत-पाकिस्तान मॅच चुकवली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुला रोज मोमोज खायचे असतात. एका प्लेटमध्ये ६३३ कॅलरीज असतात, त्या पचवण्यासाठी मला खूप व्यायाम करावा लागतो. हे बघ, तु वाईट वाटून घेऊ नकोस पण तुला बॉयफ्रेंड नकोय तर गुलाम पाहिजे आणि ही गुलामगिरी आता माझाकडून होणार नाही, सो गुडबाय.”

खरा व्हिडिओ आला समोर

तर सध्या व्हायरल होत असलेला व्हॉइस मेसेजमधील डायलॉग अॅमेझॉन मिनी टीव्ही शो ‘हाफ लव्ह हाफ अरेंज्ड’ मधील कॉपी केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे जोडप्याच्या ब्रेकअपचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरनेचे आपल्या आधीच्या पोस्टमध्ये आणखी एक व्हिडीओ जोडला आणि तो त्या मुलाने कसा कॉपी केला, हे दाखवलं आहे. सध्या या जोडप्याच्या पोस्टवर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण त्या मुलाचं बोलणं चुकीचं असल्याचं म्हणत आहेत. तर काहीजण तो योग्य बोलला असल्याचं म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “या मुलाने आपल्या गर्लफ्रेंडसमोर खरं बोलण्याचं धाडस केलं आहे, त्याला सलाम.” ही पोस्ट सध्या अनेकजण शेअर देखील करत आहेत.