Stunt viral video: सध्या रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. स्टंटसाठी वाट्टेल ते करायला लोकं नेहमी तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जगभरातील अनेक साहसी लोक स्टंट करताना आढळून येतात. लोकांचे हे स्टंट सोशल मीडियावर कायमच पहायला मिळतात. कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी जीवघेणे स्टंट करणं लोकांच्या अंगलट येतं. कोण कधी काय स्टंट करेल आणि चर्चेत येईल काहीच सांगू शकत नाही. वेगवेगळे स्टंट करत लोक प्रसिद्धी झोतात येतात. असाच एक स्टंट व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

सोशल मीडियावर असे स्टंट व्हिडीओ समोर येतात की, जे पाहून आपल्यालाही धडकी भरते. मात्र, काही लोक हे बिंधास्त करतात. असाच एक व्यक्ती चक्क कोयता फिरवत स्टंट करत आहे. यामध्ये त्याच्या हाताची बोटं कायमची तुटण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही एवढ्या मोठ्या रिस्कवर हा व्यक्ती स्टंट करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीच्या एका हातात कोयता आहे आणि दुसरा हात त्याने समोर असलेल्या टेबलवर ठेवला आहे आणि तो स्वत:च्याच बोटाच्या बाजूला जोरात कोयता मारत आहे. चुकून जरी तो कोयता त्याच्या हातावर किंवा बोटांवर बसला तर बोट तुटण्याची शक्यता आहे. मात्र, हा व्यक्ती तरीही पूर्ण ताकदीने जोर जोरात वार करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Israel War: इस्रायलमध्ये परिस्थिती गंभीर! हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हालाही संताप आला असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही या व्यक्तीच्या स्टंटवर संताप व्यक्त करत आहेत. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत अशा लोकांवर कारवाईचीही काहींनी मागणी केली आहे. हा व्हिडीओ reels1video या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत.