सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे आपणाला अनेक मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेक नेटकरी मजेदार आणि कॉमेडी व्हिडीओ त्यांच्या अकाऊंवर शेअर करत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ असे असतात, जे आपणाला पुन्हा पुन्हा पाहावे वाटतात. तर काही व्हिडीओ आपणाला आश्चर्यचकीत करणारे तर काही पोट धरुन हसायला लावणारे असतात.

सध्या असाच एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. आजपर्यंत तुम्ही दुचाकीशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. मात्र, एखाद्या बाईकमध्ये पेट्रोलऐवजी दारु भरल्याचा आणि त्यानंतर ती बाईक रस्त्यावरुन चालवल्याचं कधी पाहिलं आहे का? नसेल तर मग आज तुम्हाला ते देखील बघायला मिळणार आहे.

हेही वाचा- “पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे…” ५८ लाखांच पॅकेज तरीही नाही समाधान, सॉफ्टवेअर इंजिनीअरने लिहिलेली ‘ती’ हृदयस्पर्शी पोस्ट Viral

कारण सध्या एका तरुणाने दुचाकीच्या टाकीमध्ये दारू ओतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शिवाय या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. दारु ओतल्यामुळे बाईक कशा पद्धतीने सुसाट धावतेय हे देखील व्हिडीओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ExtreneFails नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन बाईकच्या टाकीमध्ये दारु भरल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण बाईकच्या टाकीत पेट्रोल भरण्याऐवजी दारू ओतत असल्याचं दिसत आहे. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- “कडक उन्हात आपुलकीचा गारवा…” उन्हापासून रिक्षाचालकाचा बचाव करण्यासाठी महिलेची धडपड; हृदयस्पर्शी फोटो Viral

दरम्यान, गाडीत पेट्रोलऐवजी दारु भरल्यानंतर काय होतं हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. खरं तर हा व्हिडीओ ए़़डिट करुन मीमसारखा बनवला आहे. व्हिडिओमध्ये बाईकच्या टाकीमध्ये दारु ओतल्यानंतर, बाइक वेडीवाकडी धावताना दिसत आहे. शिवाय दारू पिल्यानंतर दारुड्यांची जी अवस्था होते तशी अवस्था या बाईकची झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करताच त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, आता बाईकनेही दारू पिण्यास सुरुवात केली. आता आपण बाईकलाही आपण दारुडी म्हणू शकतो. आणखी यूजरने लिहिले की, बाईक आता थेट हवेशी स्पर्धा करणार आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेदार इमोजी दिल्या ​​आहेत.