Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आठ वर्षाची चिमुकली साठ किलोचं वजन उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होणार. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी असून ती हरियाणा रहिवासी आहे. ती देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर आहे. आठ वर्षाच्या वयात ४५ किलो वजन उचलणारी यंगेस्ट वेटलिफ्टर म्हणून तिने आधीच रेकॉर्ड बनवला आहे. आता तिचा ६० किलोचं वजन उचलणारा व्हिडीओ व्हायरल होतोय.

हेही वाचा : किळसवाणा प्रकार! रेस्टॉरंटमधील जेवणात कर्मचारी थुंकला? व्हायरल Video पाहताच नेटकरी संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्शियाचे स्वप्न

अर्शियाचे प्रेरणास्थान मीराबाई चानू असून त्यांच्याप्रमाणेच अर्शियाला देशासाठी सुवर्णपदक जिंकायचं आहे. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं. अर्शियाचे वडील फिटनेस ट्रेनर आहेत. अर्शियाला वेट लिफ्टिंगशिवाय पॉवरलिफ्टिंग आणि तायक्वांडोमध्येही आवड आहे.

हेही वाचा : फायनल मॅचच्या आधी फॅन्सचा धोनीला स्पेशल मेसेज, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक; Video Viral

नेटकऱ्यांकडून अर्शियाचे कौतुक

अर्शियाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. अनेकांनी तिच्या या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक केलं आहे. अर्शियाचे आईवडील सोशल मीडिया अकाउंटवर अर्शियाचे व्हिडीओ शेअर करत असतात.