उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील आठ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी राष्ट्रपती जाहीर झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील आठ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर
कारागृहातील आठ अधिकारी तसेच कर्मचारी यंदाच्या राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत

पुणे : उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक जाहीर करण्यात आले असून कारागृहातील आठ अधिकारी तसेच कर्मचारी यंदाच्या राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत. कारागृह विभागात वैशिष्टयपूर्ण सेवेबद्दल कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील सुभेदार संजीत रघुनाथ कदम, दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय.

येरवडा येथील हवालदार अमृत तुकाराम पाटील, रक्षक महेश हनुमंत हिरवे यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले. गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद भिकनराव अहिरराव, कारागृह अधिकारी दत्तात्रय माधवराव उमक, कल्याण जिल्हा कारागृहातील सुभेदार बाबासाहेब सोपान कुंभार, मुंबई मध्यवर्ती कारागृहातील सुभेदार प्रकाश गणपत सावर्डेकर, तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सुभेदार अशोक दगडू चव्हाण यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी राष्ट्रपती जाहीर झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 8 prison personnel conferred president s medal for meritorious service pune print news zws

Next Story
प्राक्-सिनेमाची मुळाक्षरे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी