मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवार २६ सप्टेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार असून त्या दृष्टीने सोमवारी त्यांनी राज्यातील नक्षलवादी कारवाया आणि नक्षलवादी भागातील विकास कामांची सद्य:स्थिती व रखडलेल्या कामांबाबत आढावा घेतला. नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडेही वळत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार २६ सप्टेंबरला देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीला जाण्याची तयारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील नक्षलवादविषयक आढावा बैठक घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2021 रोजी प्रकाशित
नक्षलवादविषयक बैठकीसाठी मुख्यमंत्री रविवारी दिल्लीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील नक्षलवादविषयक आढावा बैठक घेतली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-09-2021 at 00:39 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister in delhi on sunday for a meeting on naxalism akp