scorecardresearch

VIDEO: हे पाहून तुम्ही दीपिकाच्या आणखीनच प्रेमात पडाल!

या व्हिडिओमुळे तिचे चाहते पुन्हा एकवार तिच्या प्रेमात पडतील, असे दिसते.

Deepika Padukone , FB video DP , Bollywood, Hollywood, xXx: The Return Of The Xander Cage, Entertainment news, Loksatta, loksatta news, marathi, Marathi news
Deepika Padukone new FB video DP

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे सौदर्यं आणि अभिनयावर फिदा असणारे अनेक चाहते आहेत. मात्र, दीपिकाने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमुळे तिचे चाहते पुन्हा एकवार तिच्या प्रेमात पडतील, असे दिसते. दीपिकाच्या पहिल्यावहिल्या xXx: The Return Of The Xander Cage या हॉलीवूडपटाचे चित्रीकरण संपुष्टात आले असले तरी ती सध्या टोरंटोमध्येच आहे. यावेळी तिने स्वत:च्या चाहत्यांसाठी फेसबूक डीपीवर एक खास व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. यामध्ये दीपिकाने हावभावांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ‘आय लव्ह यू’ म्हटले आहे. मात्र, ‘आय लव्ह यू’ म्हणतानाचे हावभाव आणि तिच्या गालावरील मोहक खळी पाहून दीपिकाचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतील यामध्ये कोणतीच शंका नाही. तत्पूर्वी दीपिकाने ‘xXx: Return of Xander Cage’ च्या सेटवरील शेवटच्या चित्रीकरणाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिकाकडून बाईक चालवण्याचा सीन शूट करुन घेण्यात आला. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone new fb video dp will make you fall in love with her all over again

ताज्या बातम्या