मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राणवायूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.

राज्यातील प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादारांनी ९५ टक्क्यांहून अधिक साठा ३० सप्टेंबर आणि त्यानंतरही पुढील आदेशापर्यंत राखावा. पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू ठेवावे. अन्न व औषध प्रशासन, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी उत्पादक व पुरवठादारांशी योग्य समन्वय ठेवावा. वैद्यकीय प्राणवायूची गरज वाढल्यास औद्योगिक वापराचा प्राणवायू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक खबरदारी ठेवावी. आरोग्य अधिकाऱ्यांशीही सातत्याने संपर्क ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी संबंधितांना दिल्या आहेत.