मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. सेशन कोर्टाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांचीसुद्दा आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांनी स्वत: माहिती दिली असती तर इतरांना त्रास झाला नसता”, असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.

हेही वाचा- दिल्ली दौरा कशासाठी? राजधानीत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी…”

राऊतांनी स्वत:हून माहिती द्यायला हवी होती

राऊतांनी किती जमिनी घेतल्या, किती विदेश वाऱ्या केल्या. वसई प्रोजेक्टमधील घोटाळा असो किंवा पत्राचाळ घोटाळा स्वत:हून ईडीला माहिती दिली असती तर बाकिच्यांना त्रास देण्याची गरज पडली नसती. संजय राऊत नेमके कसे आहेत हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आले आहे. अजून किती आणि काय काय बाहेर येणार हे पाहत रहा, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंचे उजवे हात मानले जाणारे संजय राऊतांची कारनामे आता लोकांसमोर येईल.

हेही वाचा- अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस, किरीट सोमय्या म्हणाले, “१००० कोटी रुपयांचा…”

वर्षा राऊतांच्या नावानेही आर्थिक व्यवहार

वर्षा राऊतांच्या नावानेही आर्थिक व्यवहार वर्षा राऊतांच्या नावानेही आर्थिक व्यवहार झाले आहेत. संजय राऊत पूर्ण माहिती देत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला बोलवण्यात आले आहे. संजय राऊत घोटाळेबाज आणि माफिया आहे. त्यांना हिरो बनवण्याचं काम करु नये असंही सोमय्या म्हणाले.