लायन्सगेट प्ले हा ओटीटी प्लॅटफॉर्म गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च झाला आहे. आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच पहिलाच इंडियन ओरिजिनल शो हिकप्स आणि हुकअप्स पाहायला मिळणार आहे. लायन्सगेट प्ले हे त्यांच्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखले जातात. आता अशा प्लॅटफॉर्मवर पहिला फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार आहे. या शोचा प्रीमियर २६ नोव्हेंबर रोजी याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

या शोचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले आहे. या शोमध्ये लारा दत्ता, प्रतीक बब्बर, शिनोवा, दिव्या सेठ, नस्सर अब्दुल्ला, खालिद सिद्दीकी दिसणार आहेत. तर मीयांग चांग मुख्य भूमिकेत आहेत. भावंडांन मध्ये असलेले त्यांचे नाते यात दाखवण्यात येणार आहे.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

या शोची कहाणी ही वसुधा रावच्या अवती भोवती फिरते. ती एकटी तिच्या मुलांचा सांभाळ करत असते. तिचा भाऊ अखिल राव आणि मुलगी काव्या खट्टरसोबत ती राहत असते. सुपर टॅलेंटेड माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता तिच्या विवध भूमिकांसाठ ओळखली जातं असली तरी, प्रतीक बब्बरसोबतची तिची केमिस्ट्री नक्कीच चर्चेचा विषय असणार आहे.

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

रोहित जैन, लायन्सगेट प्ले, व्यवस्थापकीय संचालक, दक्षिण आशिया आणि नेटवर्कइमर्जिंग मार्केट्स एशिया म्हणाले, “आम्हाला आमच्या पहिल्या भारतीय ओरिजिनल मालिका हिकप्स आणि हुकअप्सचे हे नाव जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. लारा दत्ता, प्रतीक बब्बर आणि कुणाल कोहली यांनी तयार केलेली ऑनस्क्रीन जादू प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या पहिल्या भारतीय ओरिजिनल मालिकेसह, आम्ही आमच्या प्रेक्षकांचे अनोखे, ठळक आणि आकर्षक कन्टेंटसह मनोरंजन करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.