मुंबई : दोन अपत्ये, शौचालय आवश्यक अशा अटी उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याला १० वृक्षांची लागवड करणे सक्तीचे करावे, अशी शिफारस विधिमंडळाच्या तदर्थ समितीने सरकारला के ली आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  समितीची बैठक पार पडली. यात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर चर्चा करण्यात आली.   इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करणे, आमदार निधीतून ठरावीक रक्कम पर्यावरण रक्षणासाठी तरतूद करणे अशा विविध शिफारशी समितीने के ल्या आहेत.