डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस ५ सप्टेंबरला देशात दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या शिक्षक दिनी तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी काही खास करण्याचा विचार करत असाल. पण काही खास करण्याच्या हेतूने असं काही करु नका, जेणेकरुन  या दिनाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. त्यामुळे, विद्यार्थ्यानो अतिउत्साही होऊन पुढील गोष्टी करणं टाळा. 

शिक्षकांचं मन दुखावेल असे मेसेज करु नका
तुमचे वय कितीही असले तरी शिक्षकांचा दर्जा वरचा आहे. अशा वेळी शिक्षकांना मेसेज फॉरवर्ड करण्याच्या नादात तुमच्या शिक्षकांना दुहेरी अर्थाचे विनोद किंवा कविता पाठवू नका. असे केल्याने शिक्षकांचा अपमान होईल आणि शिक्षक दिनाची प्रतिष्ठाही कमी होईल.

Relationship Tips : नात्यातील प्रेम निरंतर टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्यावी

शिक्षकांच्या खासगी आयुष्याचा उल्लेख करु नका
जर तुम्ही शिक्षकांना भेटत असाल तर त्यांच्या खासगी आयुष्याचा कधीही उल्लेख करु नका. तुम्ही तसं केलेलं शिक्षकांना आवडेल असं नाही. त्यामुळे, प्रसंगावधान बाळगणं महत्त्वाचं आहे.योग्य भेटवस्तूची निवड तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी भेटवस्तू पाठवत असाल तर तिथेही काळजी घ्या. शिक्षकांना फुले पाठवत असाल तर सफेद किंवा गुलाबी रंगाची फुले पाठवा. लाल गुलाब प्रत्येकांला आवडतं, पण शिक्षकांना ते भेट देताना टाळल्यास योग्य ठरेल. तुम्ही शिक्षकांना पुस्तके, खादीचे कपडे, शोपीस यांसारख्या वस्तूही पाठवू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षकांच्या चेहऱ्यावर केक लावू नका 
जर तुम्ही आणि तुमचे वर्गमित्र शिक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी शिक्षकांच्या घरी भेट देत असाल तर उत्साहाच्या भरात कोणता दिवस साजरा करत आहात, हे विसरु नका. या अतिउत्साहात शिक्षकांच्या चेहऱ्यावर केक लावू नका.