संगीत क्षेत्रामध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. हे क्षेत्र स्पर्धात्मक असले तरी प्रगती आणि उन्नतीच्या विविध संधी मिळवून देते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीत क्षेत्रातील होतकरू मंडळींसाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी अमूक एक शैक्षणिक अर्हता आवश्यक नसते. ज्यांना वाद्यांची उत्तम जाणीव आहे, त्यात कौशल्य प्राप्त केले आहे आणि जे उत्तमरीत्या आपली कला सादर करू शकतात, अशी कोणतीही व्यक्ती या क्षेत्रात पाय रोवू शकते.संगीताची आवड असणे हा या क्षेत्रात येण्यासाठीचा प्रारंभिबदू असला तरी जोपर्यंत कौशल्य प्राप्त करत नाही तोपर्यंत पुढचे पाऊल टाकता येत नाही. संगीत क्षेत्रात येण्यासाठी सुयोग्य शिक्षण-प्रशिक्षणाची गरज भासते. शिवाय सध्याच्या काळात प्रमोशनल स्कील्सचीही आवश्यकता आहे. यामध्ये जनसंपर्क आणि मार्केटिंग याचा समावेश होतो. या क्षेत्रात करिअर करण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी द्विधा मनस्थिती ठेवणे धोक्याचे ठरूशकते. या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नवे तंत्र शिकणे, त्यात प्रावीण्य मिळवणे आणि सतत नवे नवे प्रयोग करत राहणे आवश्यकअसते. परिश्रमपूर्वक ध्यासाने हे शक्य ठरू शकते.
संगीत शिकवणाऱ्या काही संस्था : ?
बनारस िहदू युनिव्हर्सटिी
* बॅचलर ऑफ म्युझिक : कालावधी- तीन वर्षे. अर्हताकोणत्याही विषयातील बारावीउत्तीर्ण आणि संगीत विशारद असल्यास उत्तम. या अभ्यासक्रमात व्होकल आणि इन्स्ट्रमेन्टल (तबला, सितार, व्हायोलिन,बासरी) संगीत शिकवले जाते. ! दोन वर्षे कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रवींद्र संगीत. पत्ता- द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, बनारस िहदू युनिव्हर्सटिी, वाराणसी- २२१००५. वेबसाइट- www.bhu.ac.in ईमेल-controller@bhu.ac.in

दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिव्होशनल अॅण्ड फोक म्युझिक: (कालावधी- एक वर्ष.अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी)
* मास्टर ऑफ आर्ट्स इन म्युझिक वुइथ स्पेशलायझेशन इन व्होकल, सितार अॅण्ड तबला : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील किंवा सबंधित विषयातील पदवी. पत्ता- दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट, आग्रा- २८२११०,
वेबसाइट- http://www.del.ac.in
ईमेल-admin@del.ac.in

* इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्र्हसिटी
* सर्टििफकेट इन िहदुस्थानी म्युझिक : अभ्यासक्रमाचा कालावधी- किमान एक वर्ष कमाल दोन वर्षे. अर्हतादहा वी उत्तीर्ण.
* सर्टििफकेट इन कर्नाटकी म्युझिक : या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष-कमाल दोन चार वर्षे. अर्हतादहा वी उत्तीर्ण.
*( मास्टर ऑफ परफॉìमग आर्ट इन िहदुस्थानी व्होकल म्युझिक: अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. अर्हता- बीए इन म्युझिक किंवा मान्यताप्राप्त समकक्ष पदवी. पत्तास्कू ल ऑफ परफॉìमग अॅण्ड व्हिज्युएल आर्ट, आंबेडकर भवन, ब्लॉक बी, अॅकॅडेमिक कॉम्प्लेक्स, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सटिी, नवी दिल्ली-११००६८. वेबसाइट- www.ignou.ac.in ईमेल- sopva@ignou.ac.in

* मुंबई विद्यापीठ – ! बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन व्होकल म्युझिक ! डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी व्होकल क्लासिकल (कालावधी- दोन वर्षे)
! डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल
(कालावधी- दोन वर्षे)
! डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी व्होकल लाइट
(कालावधी- दोन वर्षे)
! डिप्लोमा कोर्स इन म्युझिक- िहदुस्थानी इन्स्ट्रमेन्टल
क्लासिकल- तबला (कालावधी- दोन वर्षे)
! बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन, इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल –
तबला/ सितार (कालावधी- तीन वर्षे)
! मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन, म्युझिक व्होकल (कालावधी –
दोन वर्षे) पत्ता- डिपार्टमेंट ऑफ म्युझिक विद्यापीठ, विद्यार्थी
भवन, बी रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.
वेबसाइट- http://www.mu.ac.in/arts/finearts

* रवींद्रभारती युनिव्हर्सटिी-
! बॅचलर ऑफ आर्टस् (स्पेशल ऑनर्स) इन रवींद्र संगीत.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
! मास्टर ऑफ आर्टस् इन रवींद्र संगीत अॅण्ड व्होकल म्युझिक:
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठीचा अर्ज – www.dde.rabindrabharatiuniversity.net या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. पत्ता- डायरेक्टर, डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन रवींद्र भारती युनिव्हर्सटिी, ५६ ए, बी.टी. रोड, कोलकाता- ७०००५०.
वेबसाइट- ६६६.ीि.१ु४.ूं
? अण्णामलाई युनिव्हर्सटिी
! बॅचलर ऑफ म्युझिक इन वोकल, वीना, व्हायोलीन, मृदंगम अॅण्ड फ्लुट : अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी. कालावधी ३ वर्षे.
! इंटिग्रेटेड बॅचलर इन म्युझिक (म्युझिक इन वोकल, वीणा,
व्हायोलीन, मृदंगम अॅण्ड फ्लुट) : अर्हता- दहावी.
कालावधी ५ वर्षे.
! इन्टिग्रेटेड बॅचलर इन डान्स : अर्हता- दहावी. कालावधी ५ वर्षे.
पत्ता- अण्णामलाई युनिव्हर्सटिी, अण्णामलाईनगर- ६०८००२
तामीळनाडू. वेबसाइट-www.annamalaiuniversity.ac.in
मेल dde@annamalaiuniversity.ac.in

* भातखंडे संगीत संस्था
! डिप्लोमा इन म्युझिक : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. ! बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स : कालावधी- तीन वर्षे. अर्हता- डिप्लोमा इन म्युझिक.
! सर्टििफकेट अभ्यासक्रम :
? ध्रुपद/ धमाद/ होरी
? सेमी क्लासिकल म्युझिक इन ठुमरी/ दादरा
? लाइट म्युझिक
? हार्मोनिअम/ की बोर्ड.
या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षे. पत्ता- भातखंडे म्युझिक इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सटिी, कैसरबाग लखनौ उत्तर प्रदेश.
वेबसाइट- http://www.bhatkhandemusic.edu.in
ईमेल-info@www.bhatkhandemusic.edu.in
 
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक : ! डिप्लोमा कोर्स इन तबला वादन/ पखवाज वादन : या अभ्यासक्रमाचा कालावधी ५ वर्षे. वयोमर्यादा- १७ ते २२ वर्षे. अर्हता- तबला आणि पखवाज वादनाचा तीन वर्षांचा अनुभव. दहावी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाची फी दरमहा ३०० रुपये आहे. पत्ता- कथ्थक केन्द्र, भवालपूर हाऊस, भगवानदास रोड नवी दिल्ली ११०००१. वेबसाइट- http://www.sangeetnatak.org ईमेलdelhi_kathak@yahoo.co.in

संगीतसाधना हा पेशा म्हणून स्वीकोरू
इच्छिणाऱ्यांसाठी या क लेसंबंधित विविध
अभ्यासक्र मांची माहिती देत आहोत –