18 September 2019

News Flash

भरीव सिमला मिरची

सामुग्री : पाच-सहा सिमला मिरच्या, तीन उकडलेले बटाटे, अर्धा कप मटार, एक टोमॅटो, सुके मसाले, तूप इच्छेनुसार, कांदा.

सामुग्री : पाच-सहा सिमला मिरच्या, तीन उकडलेले बटाटे, अर्धा कप मटार, एक टोमॅटो, सुके मसाले, तूप इच्छेनुसार, कांदा.

कृती : सिमला मिरची पोकळ करून पाण्यात उकळावी. उकळल्यानंतर मिरचीला उलटी करून निथळून घ्यावी. एका कढईत एक पळी तूप घालून भाजा, दीड चमचा मीठ, दोन चमचे धणे, एक चमचा हळद, अर्धा चमचा मिरची, दोन चमचे आमचूर टाकून भाजा. उकडलेले बटाटे आणि मटार भाजा. टोमॅटो टाका. आणि पुष्कळ वेळेपर्यन्त भाजा. मिश्रण सुकले पाहिजे आता सिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या प्रकारे दाबून भरा. कढईत तूप टाकून सिमला मिरची तळावी किंवा ओव्हनमध्ये बेक करावे.
अशोक महाजन

बुऱ्याचे लाडू

साहित्य : अर्धी वाटी रवा, एक वाटी बेसन, अर्धी वाटी पिठी, तीन वाटय़ा बुऱ्याची साखर, सात-आठ वेलचीची पूड, एक वाटी तूप, आवश्यकतेनुसार काजू, बदाम, पिस्ता, किसमिस.

कृती : वरील सर्व पीठ चाळणीने चाळून घ्या. एका पॅनमध्ये थोडे थोडे तूप घेऊन गॅसवर गरम करून सर्व पीठं खमंग सुगंध येईपर्यंत कमी आचेवर भाजून घ्यावे. पीठं एका परातीत काढून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते पीठ हाताने गोलाकार दिशेने फेटावे. फेटल्याने पीठ हलकं होतं व लाडू हलका होऊन खमंग होतो आता त्यात बुऱ्याची साखर, वेलची पूड, मिल्क मसाला किंवा मेव्याचे तुकडे घालून लाडू गोल वळून घ्यावे.

हे लाडू फोडणीच्या सातूच्या पीठाबरोबर किंवा तसेही फार छान लागतात.
मंदाकिनी नानिवडेकर

कैरी वडी

साहित्य : १ वाटी सोलून किसलेली कैरी, १ वाटी साखर, १ वाटी आक्रोडचा चुरा, ५ चमचे. चमचे तूप, १/२ च. चमचा वेलची पूड.

कृती : १ चमचा तुपावर कैरीचा कीस वाफवून घेणे. साखरेचा १ तारी पाक करून घेणे. त्यात ५ च. चमचे तूप घालावे. नंतर कैरीचा कीस घालून ढवळावे. वरील मिश्रणात आक्रोडचा चुरा घालून मिश्रण सतत ढवळत राहावे. थापण्या इतपत झाल्यावर गॅस बंद करावा.

तूप लावलेल्या थाळीत मिश्रण थापून घ्यावे व गार झाल्यावर वडय़ा पाडाव्यात.
ममता कळमकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 23, 2016 1:12 am

Web Title: food reciepe by reader