मीरा रोड येथे उभारल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या हिंदी भाषिक भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अखेर वादाच्या भोवऱ्यात संपन्न झाला. यावेळी भवणाला विरोध करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा- Shraddha Walker murder case: आफताबची आठ तास ‘पॉलीग्राफ’ चाचणी; सदनिकेतून पाच चाकू जप्त

मीरा भाईंदर शहरातील वाढती अमराठी भाषिक नागरिकांची संख्या लक्षात घेता शहरात एक हिंदी भाषिक भवन उभारले जावे, अशी मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार मीरा रोड येथील जे. पी इन्फ्रा परिसरात पालिकेकडून सुविधा भूखंडावर विकासकाला विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ”हरिवंश राय बच्चन’ या हिंदी भाषिक भवनाची निर्मिती केली जाणार आहे. रविवारी या भवनाच्या भूमिपूजणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उत्तर प्रदेश राज्याचे मंत्री स्वतंत्र देव सिंग हे मुख्य उदघाटक म्हणून उपस्थितीत होते.तसेच स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, आयुक्त दिलीप ढोले, माजी राज्य गृहमंत्री कृपा शंकर सिंग, भाजप जिल्हाध्यक्ष रवि व्यास,आणि माजी नगरसेवक विक्रम प्रताप सिंग हे उपस्थितीत होते.शहरात मराठी भाषा भवन नसताना थेट हिंदी भाषिक भवन उभारले जात असल्यामुळे या कार्यक्रमांस मराठी एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवत विरोध आंदोलन केले. त्यामुळे अशा एकूण १२ कार्यकर्त्यांना काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले. तर येथे हिंदी भाषा भवनांची निर्मिती होत असली तरी येथील हिंदी भाषिक हे मुळ महाराष्टीयन असून विनाकारण त्याला राजकीय वळण देऊन विरोध करणे हे चुकीचे असल्याचे मत सर्व उपस्थितीत पुढऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा- आयसीआयसीआय बॅंक दरोड्यातील आरोपी अनिल दुबे फरार; वसई न्यायालयातून पोलिसांना चकमा देत पलायन

असे असणार हिंदी भाषिक भवन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरा रोड येथे उभारले जाणारे हे हिंदी भाषिक भवन ठाणे जिल्हातील पहिले भवन ठरणार आहे.साधारण १० हजार चौरस मीटर पसरलेल्या या जागेत प्रथम टप्प्यात तीन मजले उभारले जाणार आहेत.या तीन मजल्यामधील पहिल्या दोन मजल्यावर कार्यक्रम करण्यासाठी विशेष सभागृह उभारले जाणार आहे. तर उर्वरित राहिलेल्या तिसऱ्या मजल्यावर ‘परिषद सभागृहाची निर्मिती केली जाणार आहे.यात विविध राज्यातून आलेल्या हिंदी भाषिक नागरिकांना साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली जाणार आहे.तसेच येत्या १८ महिन्यात या भवनाची निर्मिती पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.