लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बजरंग दलाने तक्रार दिली होती.

राम बहुजनांचे असून ते मांसाहारी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच केले होते. यावरून संपूर्ण राज्यातील वातावरण पेटले आहे.यावर आव्हाड यांनी खेद व्यक्त केले असले तरी वाद मिटलेला नाही. यामुळे संपूर्ण राज्यात त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात येत आहे.

आणखी वाचा-राज्यातील बेकायदेशीर वाहन घोटाळा प्रकरण, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वसईत ४ वाहने जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाईंदर मध्ये देखील बजरंग दलाने आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.