भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सध्या शहरात ४० रुग्ण डेंग्यूने ग्रस्त असून, पावसाळ्यात हा आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात डेंग्यू व मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाययोजना राबवण्यात येतात. यात प्रामुख्याने औषध फवारणी, पाणी शुद्धीकरण आणि स्वच्छतेचा समावेश आहे. मात्र तरीही डेंग्यू व मलेरिया या साथरोगांची लागण होऊन बाधित होणाऱ्यांचे प्रमाण पालिकेच्या नोंदीनुसार वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

शहरात मार्च महिन्यात डेंग्यू आजाराचे ३ संशयित रुग्ण होते. मात्र महिन्याच्या अखेरीस हा आकडा ४० वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात मलेरिया आजाराचे २१ संशयित रुग्ण होते, तर मे महिन्यात हा आकडा तब्बल ५४ वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार लहाने यांनी केले आहे.

पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन

डेंग्यू आजाराचा मुख्य प्रसार पावसाळ्यात अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा पावसाळ्यात डेंग्यू आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पावसाचे पाणी आपल्या अवतीभवती कुठेही साचू देऊ नये, कोणत्याही स्वरूपाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत, तसेच पोषक आहार घ्यावा, अशा स्वरूपाची जनजागृती पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही आजारांचा प्रसार अत्यंत कमी प्रमाणात होत असला तरी नागरिकांनी गाफील न राहता गांभीर्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉ. नंदकुमार लहाने यांनी केले आहे.

डेंग्यू आजाराची आकडेवारी

जानेवारी – ०१

फेब्रुवारी – ००

मार्च – ०२

एप्रिल – १४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे – २३