वसई – इन्स्टाग्रामवर तरुणींशी ओळख करून नंतर त्यांची लैंगिक आणि आर्थिक शोषण करणारा डॉक्टर अखेर गजाआड झाला आहे. योगेश भानुशाली असे या आरोपीचे नावा असून त्याला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत ३ तरुणींनी बलात्कार आणि फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. आणखी मुली त्याच्या जाळ्यात फसल्या असण्याची शक्यता असून पोलीस शोध घेत आहेत. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीस आणले होते.

नालासोपारा येथे राहणार्‍या २१ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर डॉ, योगेश भानूशाली (३१) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रित रुपांतर झाल्यानंतर त्याने तिच्याशी प्रेमसंबंध बनवले. यानंतर वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्याकडून पैसे उकळू लागला. नंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केली होती. यामुळे ही मुलगी प्रचंड नैराश्यात गेली होती. तिच्या आईने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र ती तक्रार देण्यास तयार नव्हती. तिच्या हातावरदेखील आरोपी योगेशचे नाव टॅटू काढून गोंदवले होते. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर पाटील यांनी मुलीचे समुपदेशन करून तिला तक्रार देण्यास मन वळवले. पोलिसांवर विश्वास बसल्यानंतर मग तिने तक्रार दाखल केली. तिच्यावर मालाडमधील योगेश भानूशालीच्या घरी बलात्कार झाल्याने गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी भानूशालीवर गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा – नायगाव मध्ये ११ वर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या

हेही वाचा – विरार मध्ये आणखी तीन विकासकांवर गुन्हे दाखल; बनावट बांधकाम परवानगी बनवून उभारल्या अनधिकृत इमारती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर वापी (गुजराथ) येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने तसेच मुंबईत राहणार्‍या आणि कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या २३ वर्षीय तरुणीने या डॉक्टर विरोधात बलात्काराच्या तक्रारी दिल्या. इन्स्टाग्रामवर ओळख करून प्रेमजाळात ओढून तो या तरुणींशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा तसेच त्यांच्याकडून पैसे उकळत होता. या प्रकरणात आणखी ६ ते ७ तरुणी असल्याची शक्यात पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी व्यक्त केली आहे. आरोपी भानूशाली याच्याविरोधात २०२० मध्येदेखील बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.