भाईंदर :- मिरा-भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा (७२) यांचे सोमवारी प्रकृती खालावल्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिरा-भाईंदर शहराचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला होता. उत्तन येथील ईस्ट इंडियन समाजातून येणारे मेंडोन्सा यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून अंतर घेतले होते.