वसई:- नालासोपारा पूर्वेच्या चक्रधर नगर परिसरात पूजा पॅलेस या इमारतीला लागून असलेली सुरक्षा भिंत अचानक कोसळली. बुधवारी रात्री ही घटना घडली असून या घटनेची चित्रफीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही
नालासोपारा पूर्वेच्या चक्रधर नगर परिसर आहे. याच परिसरात पूजा पॅलेस इमारत आहे. त्या इमारतींच्या सभोवताली संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. बुधवारी अचानकपणे या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भिंतीला लागून पार्क केलेल्या अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून असून त्यात भिंत काही क्षणातच कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. या इमारतीच्या आसपास नेहमीच लहान मुले खेळत असतात. मात्र भिंत कोसळली तेव्हा मुले जवळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दुर्घटनांचे सत्र सुरूच
मागील एक महिनाभरा पासून वसई विरार शहरात दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. इमारत कोसळणे,इमारतींचा स्लॅब कोसळणे, गटारांवरील स्लॅब कोसळणे अशा विविध दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.