वसई: मुंबईत राहणार्‍या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराची नालासोपार्‍यातील एका महिन्यातील ही ६ वी घटना आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची असून मुंबईत राहते. तिची नालासोपार्‍यात राहणार्‍या अनिस शेख (२३) या तरुणाबरोबर ओळख झाली. त्याने २ सप्टेंबर रोजी तिला नालासोपा़र्‍यात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. ५ सप्टेंबर रोजी तिला पुन्हा नालासोपारा येथे बोलावले होते. त्यानंतर सनसाईन उद्यानात आरोपी अनिस शेख आणि त्याचा मित्र जियान या दोघांनी तिच्याशी लगट केली. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून अर्नाळा येथील एका लॉज मध्ये नेले. तेथेच अनिस शेख याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

झियान याने त्या संबंधाचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केल आणि हा प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी देत मारहाण देखील केली. या प्रकरणी पीडित मुलीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पहिला गुन्हा आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो आचोळे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

हेही वाचा : भाईंदर : महापालिकेमार्फत उत्तनच्या समुद्र किनाऱ्याची स्वच्छता, ३ हजार जणांचा सहभाग, ३७ टन कचरा जमा

आचोळे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(१), ७४, १३७(२), ११५(२), ३५१(२) ३(५) तसेच पोक्सोच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आम्ही अनिस शेख या आरोपीला अटक केली आहे. अन्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकीस्टिकने मारहाण, नालासोपारा स्थानकातील घटना

मागील काही दिवसांतील नालासोपार्‍यातील सामूहिक बलात्काराच्या घटना

  • ३ सप्टेंबर २०२४- कामाच्या शोधासाठी आलेल्या महिलेवर नालासोपार्‍याच्या धानिव बाग येथे दोघांचा सामूहिक बलात्कार
  • ९ सप्टेंबर २०२४- गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षांच्या मुलीवर दोन इसमांकडून शिर्डीनगर येथे सामूहिक बलात्कार
  • २१ सप्टेंबर २०२४- नालासोपारा येथे राहणार्‍या २२ वर्षीय तरुणीवर नवीन सिंग आणि संजीव श्रीवास्तव या दोघांनी तिला गुंगीकार औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी तिचा हेमा सिंग हिने अश्लील चित्रफित तयार केली. त्या आधारेननवीन सिंग तिच्यावर सतत बलात्कार करत होता. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला.
  • २२ ऑगस्ट २०२४- नालासोपारा येथील धानिव बाग परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार.