वसई: नालासोपारा एसटी आगाराजवळ गुरूवारी दुपारी एका एटीएम व्हॅन मध्ये साडेतीन कोटी रुपयांची रोकड आढळली आहे. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ही रोकड असलेली व्हॅन जप्त केली असून एवढी रक्कम कुणासाठी आणली त्याची चौकशी सुरू आहे.

गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास एका एटीएम व्हॅन मध्ये संशयास्पद रोकड असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने ही व्हॅन आणि त्यातील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. बँकेच्या एटीएम मध्ये भरण्यासाठी ही रक्कम आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र व्हॅन मध्ये असलेले साडेतीन कोटी रुपयांचा हिशोब जुळत नसल्याने या रकमेबाबत संशय निर्माण झाला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे हे घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी हजर झाले आहे.

हेही वाचा : प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे कार्यतर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. ही घटना संशयास्पद आहे. या गाडीत साडेतीन कोटी रुपये असल्याचे समजते. त्यापैकी केवळ ४० लाखांचा हिशोब जुळत आहे. उर्वरित रोकड कुणासाठी आणली? कुणी आणली? त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे नेते उमेश नाईक यांनी केले आहे.