वसई : वसई विरारला येण्याच्या मार्ग खडतर असल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे नाव मी ‘डेथ ट्रॅप’ ठेवले होते, असेही ते म्हणाले. त्यामुळे येत्या एक महिन्यात १२१ किलोमीटरचा मुंबई-अहमदाबाद महामार्ग सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. विरारमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

वसई जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ कार्यक्रमासाठी शुक्रवारी नितीन गडकरी विरार मध्ये आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. मुंबई अहमदाबाद महामार्ग हा जेव्हा बांधला तेव्हा पासून येथे प्रचंड अपघात होत आहेत, त्यामुळे या रस्त्याचं नाव मी डेथ ट्रॅप ठेवलं होतं. इथे खूप अपघात होतात. आता देखील या रस्त्यावरून येताना प्रवास किती कठीण आहे हे समजलं. यासाठी १२१ किलोमीटर लांबीचा मुंबई अहमदाबाद महामार्ग सिमेंटचा बनवला जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली.

हेही वाचा : विरारमध्ये इमारतीच्या बेडरूमचा स्लॅब कोसळला; तरुणीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपासून येत्या एक महिन्यात हे काम सुरू केले जाईल, या महामार्गावर तीन अंडरपास असून दहा फूट ओव्हर ब्रिज बनवले जाणार आहेत. या कामाचा खर्च ६०० कोटी रुपये एवढा आहे. प्रस्तावित दिल्ली मुंबई महामार्ग देखील वसईशी जोडला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे वसईकराना थेट मुंबईत जाता येईल, असे त्यांनी सांगितले