scorecardresearch

Premium

नवघर येथील उपजिल्हा रुग्णालयाला जागेची अडचण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेची मागणी

वसईत प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा अडचण भेडसावत असल्याने आता सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) मागणी करण्यात आली आहे.

vasai navghar sub district hospital, navghar sub district hospital, hospital running out of space
नवघर येथील उपजिल्हा रुग्णालयाला जागेची अडचण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेची मागणी (संग्रहित छायाचित्र)

वसई : वसईत प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा अडचण भेडसावत असल्याने आता सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) मागणी करण्यात आली आहे. ही जागा प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेला लागून आहे. दोन्ही जागा एकत्र केल्यास दोनशे खाटांचे रुग्णालय उभे राहू शकणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी देखील या मागणीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यातच अद्ययावत रुग्णालय नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी वसई विरार शहरात शासकीय रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात येत होते. वसई पश्चिमेच्या नवघर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ही जागा सुमारे ६० गुंठा परिसरात आहे. या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता. २०१४ पासून हा प्रस्ताव प्रलंबितहोता. यानुसार रुग्णालयाच्या बांधकामासंदर्भातील फेब्रुवारी २०१८ मध्ये ४१ कोटी १४ लाखाचे अंदाजपत्रक आरोग्य विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविले होते. परंतु अद्याप रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही. रुग्णालयाच्या कामात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे नकाशे आणि निधी मंजूर असूनही रुग्णालयाचे काम सुरू झालेले नव्हते.

msrdc, Nepean Sea Road , Office, land, development, revenue generation, mumbai,
मुंबई : नेपीयन्सी रोडवरील कार्यालयाच्या जागेचाही विकास?
hospital of Ulhasnagar
उल्हासनगरचे अत्याधुनिक रुग्णालय नागरिकांच्या सेवेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण
Distribution of kitchen materials wardha
वर्धा : ताटवाट्या वाटप, झुंबड उडाल्याने अपघाताची शक्यता
belapur parking marathi news, belapur parking facility marathi
नवी मुंबई : बहुमजली वाहनतळ लवकरच कार्यान्वित होणार, वाशीतही वाहनतळ निर्माण करण्याचे नियोजन

हेही वाचा : वसई : पायातील धाग्यावरून लावला हत्येचा छडा, तरुणाच्या हत्या प्रकरणात तिघांना अटक

दरम्यान, रुग्णालय तयार होत आहे तर ते शंभर खाटांऐवजी २०० खाटांचे करावे असा प्रस्ताव समोर आला होता. परंतु त्यासाठी जागेची नवीन अडचण उभी राहिली होती. यासाठी आता रुग्णालयाला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा मिळाली तर एकत्रित ८० गुंठे जागेवर रुग्णालय उभे राहू शकेल अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजाराम बाबर यांनी केली आहे. त्यासाठी ते शासन दरबारी पाठपुरावा करत आहे.

नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० गुंठे जागा आहे. त्याला लागून सार्वजनिक बांधकाम खात्याची (भूमापन क्रमांक ६४/ब/१) २४ गुंठे जागा आहे. त्या जागेवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांचे छोटे कार्यालय असून उर्वरित जागा मोकळी आहे. या दोन्ही जागा एकत्र केल्यास तेथे बहुमजली रुग्णालय उभे राहू शकेल असे बाबर यांनी सांगितले. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक अहवाल दिला असून यासंदर्भातल अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले होेते. खासदार राजेंद्र गावित यांनी देखील जागेची अडचण असल्याचे मान्य केले. शहरातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी २०० खाटांच्या रुग्णालयाची गरज आहे. त्यासाठी आचोळे येथील जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे गावित यांनी सांगितले.

हेही वाचा : चिखलडोंगरी गावातून बहिष्कृत केलेले ग्रामस्थ गावात परतले; दहशतमुक्त वातावरणात मोकळा श्वास

शासकीय रुग्णालये रखडली तर खासगी जोमात सुरू

मागील दोन तीन वर्षांपासून शहरात एकापाठोपाठ एक खासगी रुग्णलाय सुरू असताना पालिका आणि शासकीय रुग्णलयांचे काम रखडले आहे. वसईती सर डीएम पेटीट रुग्णालयाचा विस्तार रखडला आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रुग्णालयाची जागा बदलल्याने अद्याप काम सुरू झालेेले नाही. नवघर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि खानिवडे रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In vasai navghar sub district hospital running out of space demand of land to pwd css

First published on: 29-11-2023 at 12:45 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×