केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून रुग्णालयाला २५ लाखांची मदत

वसई: करोना काळात प्राणवायूची गरज लक्षात घेऊन वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस मेमोरिअल रुग्णालयात दोन प्राणवायू निर्मिती संच प्रकल्प बसविण्यात आले आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी आठवले यांनी रुग्णालयाला आपल्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. वसईतील ४० वर्ष जुने कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांवर माफक दरात उपचार केले जातात. करोनाकाळात या रुग्णालयाने उल्लेखनीय सेवा केली होती. आता रुग्णालयाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दोन स्वतंत्र प्राणवायू निर्मिती गूगलच्या माध्यमातून प्रकल्प पाथ या संस्थेच्या सहकार्याने बसवले आहे. शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे सामाजिक कार्य पाहून २५ लाखांचा आर्थिक मदत खासदार निधीतून जाहीर केली. करोनाचा मानवतेविरोधात लढा सुरू आहे. पण मानव या लढय़ात विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 गूगलच्या माध्यमातून देशभरात ८० ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील १० रुग्णालयांमध्ये फ्लॅट उभारण्यात येणार असून त्यात पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात कर्डीनल ग्रेशस मेमोरियल रुग्णालयामध्ये दोन प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याची किंमत एक कोटी रुपये असून तेथे मिनिटाला ८०० लिटर तासाला ४८ हजार लिटर तसेच  दिवसाला ११ लाख लीटर प्राणवायूची निर्मिती करण्यात येणार आहे यावेळी अध्यक्ष म्हणून वसई धर्मप्रांताचे धर्मगुरू आर्चबिशप फेलिक्स मच्याडो, बोईसर मतदार संघाचे आमदार राजेश पाटील संचालक रोहन घोन्साल्विस, युरी घोन्साल्विस आदी मान्यवर उपस्थित होते.