वसई : विरार पूर्वेच्या कारगिल नगर परिसरात मद्याच्या नशेत एका मित्राने दुसऱ्या मित्राने चाकू भोसकून हत्या केली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मेहुल शहा (२७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा कारगिल नगर भागात अनिकेत गायकवाड व त्याचा मित्र मेहुल शहा दोघे ही नशा करत बसले होते. याच दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले यावेळी मेहुल पळत असताना अनिकेत याने त्यांच्यावर चाकूने सापासप वार केले या मेहुल याचा मृत्यू झाला आहे. तर अनिकेत ही मारामारीत जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अनिकेत गायकवाड याला अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान व अमली पदार्थांच्या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मित्रानेच मित्रांची हत्या केल्याच्या घटनेमुळे परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.

यापूर्वी वसई पश्चिमेच्या पापडी येथील औद्योगिक वसाहत परिसरात तरुणांच्या वाढदिवस पार्टीत (मेजवानी) क्षुल्लक वादावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर गंभीर मारामारीत होऊन यावेळी झालेल्या हल्ल्यात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले होते.