लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : विरारमध्ये एका इसमाने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर फरार झालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरातील वावटेवाडी येथील एकविरा इमारतीत गोपाळ राठोड(३८) हा पत्नी भारती (३२) आणि १४ वर्षीय मुलीसोबत रहात होता. गोपाळ यास मद्याचे व्यसन होते. गोपाळचा पत्नीच्या चारित्र्यावरही संशय होता. त्यावरून त्याचे पत्नी भारती सोबत भांडणे व्हायची. शुक्रवारी त्यांच्यात नेहमीप्रमाणे भांडण झाले होते. त्यावेळी राठोड याने पत्नी भारतीच्या छाती आणि पोटावर वार केले. यात तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-पालिकेच्या व्हीआयपींच्या यादीत राजकारण्यांचा भरणा; शहरातील मान्यवर नागरिकांना वगळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या गोपाळ याला कल्याण येथून पोलिसांनी अटक केली आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करत होते. त्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी गोपाळ याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.