भाईंदर – भाईंदरमध्ये एकाच खोलीत राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अनिस नबी (४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो दोन दिवसापूर्वीच गावावरून मित्र संजय शर्मासोबत मुर्धा गावातील बहदूर नगर येथे राहायला आला होता. संजय शर्मा हा रंगकाम करणारा मजूर आहे.दोघेही याच खोलीत पापड विक्रीचे काम करणाऱ्या कैलास राम व त्याच्या मुलासोबत राहत होते.दरम्यान ११ जून रोजी पहाटे ४ च्या सुमारास संजय शर्मा ने अनिस नबी ची कोयत्याने हत्या करून फरार झाल्याची तक्रार कैलास ने पोलिसांना दिली आहे.
अनिस हा संजय शर्मा चा मित्र असल्यामुळे त्याबाबतची अधिक माहिती इतर कोणाकडे नाही आहे. तर या हत्ये मागचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. तर ही हत्या पूर्व-नियोजन करून केल्याचा देखील पोलिसांना संशय असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे.