राजा जाधव यांच्या शिवप्रेमाचा अनोखा छंद

सुहास बिऱ्हाडे

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे

वसई: छत्रपती शिवाजी  महाराजांच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता वाटेल ते करायला तयार होते. राजा जाधव या शिवप्रेमींना महाराजांच्या कार्याने असेच झपाटून टाकले आहे. जाधव यांना शिवरायांच्या काळातील नाणी जमविण्याचा छंद असून त्यासाठी मागील ४० वर्षांपासून ते महाराष्ट्र पालथा घालत आहेत. जाधव यांच्याकडे शिवरायांच्या काळातील पाचशेहून अधिक मोहरा तसेच विविध काळांतील ४० हजारांहून अधिक नाणी संग्रही आहेत. यासाठी त्यांनी आपल्या घरातच संग्रहालय तयार केले आहे.

राजा जाधव हे मूळचे नालासोपारा येथील रहिवासी. महाराष्ट्रातील इतर सर्वसामान्य जनतेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. शिवरायांचा अभ्यास करताना १९८१ मध्ये ते गंगोत्री येथे गेले असताना त्यांना एक शिवकालीन नाणे आढळले. तेव्हापासून त्यांना शिवकालीन मोहरा म्हणजे शिवराई जमविण्याचा छंद लागला. शिवरायांच्या काळातील होन मिळत नसले तरी शिवराई नाणी ठिकठिकाणी आढळतात.  मागील ४० वर्षांपासून ते विविध ठिकाणी शिवराई नाण्यांचा शोध घेत आहेत. पूर्वी गड काबीज केल्यावर गडावर नाणी उधळली जायची. यातील असंख्य नाणी कडय़ाकपारीत, झाडाझुडपात अडकून पडलेली आहेत. पावसाळय़ात ती घरंगळून खाली येतात. ही नाणी गोळा करून ग्रामस्थ विकतात. त्यांना झाडकरी म्हणतात. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, वाई, कोल्हापूर या ठिकाणी गोसावी समाजाकडून  नाणी  विकत घेऊन माझ्या संग्रही ठेवू लागलो, असे जाधव यांना सांगितले.  शिवराई नाणे दोन प्रकारचे आहे. लहान ४ ग्रॅमचे तर मोठे ८ ग्रॅमचे.  नाण्यांचा संग्रह करता करता त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली आणि मग विविध संदर्भग्रंथे आणि पुस्तके जमा करू लागले. त्यातून त्यांच्याकडे १० हजारांहून अधिक पुस्तके संग्रही  झाली. त्यासाठी त्यांनी खासगी वाचनालयदेखील सुरू केले आहे.  संग्रहालयामुळे घरी अनेक जण नाणी बघण्यासाठी येत असतात.  नाणी आणि पुस्तकांबरोबर त्यांनी शिवकालीन विविध वस्तूदेखील आपल्या संग्रहात जमविल्या आहेत.

सातवहन काळापासूनची नाणी

राजा जाधव यांच्याकडे सातवहन काळापासून यादवकालीन, मोहम्मद तुघलक, अकबर, औरंगजेब, शहाजहान आदी मोगल काळापासून ब्रिटिश ईस्ट इंडिया, राणी एलिझाबेथ काळातील नाणी संग्रहात जमा झाली आहेत. यासाठी जाधव यांनी नालासोपारा आणि मुंबईतील दादर येथील निवासस्थानी नाणी संग्रहालय तयार केले आहे. ही नाणी शेकडो वर्षे जुनी असल्याने त्यांची खास देखभाल करावी लागत आहे.