वसई : दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठा संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. शनिवारी सायंकाळी नालासोपाऱ्यात प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.तर दुसरीकडे याचा फटका रुग्णवाहिकेला बसला.मागील काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ ही पूर्व पश्चिम अशा दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावर वाढली आहे.

त्यामुळे सातत्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः सणासुदीच्या काळात नालासोपाऱ्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. शनिवारी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक घरा बाहेर पडले होते. मात्र वाहनांची वाढती गर्दी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चालविल्या जाणाऱ्या वाहनचालक यामुळे सायंकाळी नालासोपारा उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती. पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ये जा करण्यास ही जागा नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तासंतास यात प्रवासी अडकून पडले होते.याशिवाय या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला बसला. बराच वेळ रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडली होती.

हेही वाचा…“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!

वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण केले जात असले तर रस्त्याच्या मध्येच उभी केलेली वाहने, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली होती.दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले असे प्रवाशांनी सांगितले. या वाहतुक कोंडीमुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.

हेही वाचा…विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी पुण्यातील भाजपच्या इच्छुक असलेल्या नेते मंडळींची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरीवाल्यांमुळे कोंडीत भर

दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने मुख्य रस्ते यासह पदपथावर फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत.त्यामुळे वाहने व प्रवासी यांना ये जा करण्यासाठी मार्गच शिल्लक नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. आधीच रस्ते अपुरे आहेत. त्यातच अशा प्रकारे बेकायदेशीर पणे बसणारे फेरीवाले यामुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.