लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नुकताच परिमंडळ १ च्या पोलिसांचे ऑलआउट कोंबिंग ऑपरेशन पार पडले. या दरम्यान नाकाबंदी व विविध ठिकाणी तपासण्या करून दोषी आढळून येणाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-१ मध्ये येणाऱ्या पोलीस ठाणे हद्दीतील मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत परिमंडळ-१ अधिनस्त काशिमीरा, काशिगांव, मिरारोड, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन पोलीस ठाण्यामध्ये नुकताच ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती.

यात ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान ५ वॉरंट मधील आरोपीत यांना अटक करण्यात आले, एन.डी.पी.एस. कायदयान्वये ०४ केसेस करण्यात आल्या, ०१ इसमावर सी.आर.पी.सी. १२६ प्रमाणे व २ इसमावर सी.आर.पी.सी. १२८ प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली, दारुबंदी कायद्यान्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आले, २४ हिस्ट्रीशिटर तपासले, ७ गुंड आरोपी चेक केले, १ विदेशी नागरीक तपासला, ५ तडीपार इसमाना तपासले असता १ त्यात एक जण आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. याशिवाय हॉटेल व लॉजेस होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जवळपास ६५ हॉटेलची तपासणी पोलिसांनी केली.

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विभागीय सर्व सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाकाबंदी दरम्यान १४५ वाहनधारकांवर कारवाई

शहराच्या वाढत्या नागरिकरणा सोबतच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यातच काही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवित असतात याचा फटका वाहतुकीला बसत असतो. यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना घडत असतात. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे, विना सीटबेल्ट, विना परवाना, विना हेल्मेट प्रवास, भरधाव वेगाने वाहने चालविणे, ट्रिपलसीट,वाहने चालविताना मोबाईलचा वापर, विना नंबर प्लेट अशा विविध प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात अशा वाहनधारकांची नाकाबंदी दरम्यान तपासणी सुरू केली होती. यात ३४६ वाहनांची तपासणी केली यात १४५ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.