वसई: ३१ डिसेंबरच्या मेजवान्या पार्ट्या व नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी वसई विरार शहर सज्ज झाले आहे. या भागात समुद्र किनाऱ्यावर असलेली रिसॉर्ट, हॉटेल, फार्म हाऊससाठी आगाऊ नोंदणी झाल्यानंतर सर्व हाऊस फुल्ल झाले आहेत.

वसईचा परीसर हा निसर्गरम्य असून या परिसराला मिनी गोवा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ,त्यामुळे येथील समुद्र किनारे विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. विकेंड व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी अधिक असते. मात्र वर्षांतील  नवीन वर्षाचे स्वागत (थर्टीफस्ट सेलिब्रेशन) करण्यासाठी येथील हॉटेल्स व रिसॉर्टस मध्ये जास्त प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते.

हेही वाचा >>>टिवरी ग्रामपंचायतीचा इव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर

नाताळचा सण सुरू झाल्यापासूनच मुंबईसह ,नवीमुंबई,ठाणे परिसरातील पर्यटकांनी वसईतील पर्यटन स्थळांवर गर्दी करायला सुरूवात केली आहे.  अर्नाळा,राजोडी, कळंब आदी विविध समुद्र किनाऱ्यावर गर्दी वाढली असून वसईतील रिसॉर्ट, हाऊस फुल्ल होऊ लागली आहे. तर दुसरीकडे फार्म हाऊसच्या दिशेने ही पर्यटकांची पावले वळली असल्याने तेथेही पर्यटकांची गर्दी होत आहे.  रिसॉर्ट मध्ये नवीन वर्ष स्वागतासाठी खास मेजवान्याचे आयोजन केले आहे. डिजे आणि बॅण्ड पथक, आकर्षक रोषणाई करण्यात येत आहेत. त्यामुळे गुलाबी थंडीत वसईच्या किनारपट्टीवर रोषणाईची उधळण बघायला मिळत आहे. पर्यटकांसाठी आम्ही खास व्यवस्था केली आहे. मद्यपानासाठी एक दिवसांचा परवाना काढला आहे, अशी माहिती मिनी गोवा रिसॉर्टचे मालक धीरज निजाई यांनी दिली. अनेकांनी रिसॉर्ट ऐवजी खासगी व्हिला बुक करून कौटुंबिक सोहळा आयोजित केला आहे. रिसॉर्ट मधील गोंधळ, जल्लोष कुटुंबातील ज्येष्ठांना सहसा आवडत नाही. त्यामुळे सर्व कुटुंबाला एकत्र करून कौटुंबिक सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही खासगी व्हिल्यात मेजवानीचे आयोजन केले आहे, असे विरार मधील प्रतीक ठाकूर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारंपारिक पद्धतीच्या खाद्यपदार्थांना मागणी

पर्यटकांकडून या ठिकाणी आल्यानंतर येथील पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या जेवणाला अधिकच पसंती मिळत आहे.आगरी, कोळी, वाडवळी अशा वसईच्या खास पारंपरिक गावठी पद्धतीच्या चविष्ट स्वयंपाकाला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. या मेजवान्यांसाठी महिलांच्या बचत गटांना फ्राय मच्छी, मच्छी करी , गावरान कोंबड्या ,आगरी मटण आणि हात भाकऱ्या यांच्या आगाऊ ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत.