लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: विरार पूर्वेच्या पारोळ परिसरात नदीवर बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करताना एका गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला आहे. संजय हरीचंद्र पाटील (४५) असे या गणेशभक्ताचे नाव आहे.

बुधवारी वसई विरार शहरात विविध ठिकाणी दीड दिवसांच्या बाप्पाला भक्ती भावाने निरोप देण्यात आला. पारोळ येथे राहणारे संजय पाटील हे सुद्धा पारोळ – शीरवली पुलाजवळील विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. याच गणेशमूर्तीचे विसर्जन करताना पाण्यात पडून प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल व स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने संजय यांचा शोध सुरू होता.

हेही वाचा… वसईत किरकोळ कारणावरून गायकाची हत्या; वाहनचालकास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात ते आठ तासानंतर रात्री उशिरा संजय यांचा मृतदेह नदीत सापडला असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विसर्जनादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरार पूर्वेच्या ग्रामीण भागातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.