लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ६० वर्षीय स्वयंघोषित वैद्याच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी २२ वर्षांची असून मुंबईत राहते. याप्रकरणी तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार नालासोपारा पश्चिमेच्या छेडा नगर येथील गौरव गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये बाबासाहेब पाटील हा डॉक्टर मूळव्याधीवर इलाज करतो. मंगळवारी ती उपचारासाठी पाटील याच्याकडे आली होती. त्यावेळी पाटील याने पीडितेकडे शरिरसुखाची मागणी देखील करून नंतर तिच्याशी लैंगिक कृत्य केले. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६) आणि विनयभंग (कलम ३५४) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबासाहेब पाटील नाशिक येथे राहणारा असून दर आठवड्याला नालासोपाऱ्यात उपचारासाठी येत असल्याने इमारतीच्या रहिवाशांनी सांगितले. पाटील हा डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही. मात्र तो वैद्य असल्याचा दावा करून मागील ३० वर्षांपासून मुळव्याधीवर उपचार करत असल्याचे सांगत असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक प्रमोद कदम यांनी दिली.