वसई : श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी तीन जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात हे जवाब नोंदविण्यात आले. या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलीस सलग चौथ्या दिवशी वसईत तळ ठोकून आहे. आफताबने २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती. त्या वेळी ती नालासोपारा येथील ओझॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यां महिलेच्या मदतीने तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सोमवारी ओझॉन रुग्णालयाचे डॉ. शिवप्रसाद शिंदे, तसेच सामाजिक कार्यकर्त्यां पूनम बिडलान यांचे जबाब नोंदवले. श्रद्धा आणि आफताब नायगाव येथील एका इमारतीत भाडय़ाच्या सदनिकेत राहात होते. त्याच्या मालकाचाही जवाब पोलिसांनी नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 श्रद्धाच्या वडिलांची किरीट सोमय्यांकडून विचारपूस  

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी दुपारी श्रद्धा वालकरच्या घरी जाऊन तिच्या वडिलांची भेट घेतली. याप्रकरणी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी त्यांनी केली. या हत्येमागे अन्य कुणाचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करून त्या दृष्टीनेही चौकशी करण्याची मागणी केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement of the three persons vasai delhi police shraddha walker murder case ysh
First published on: 22-11-2022 at 01:46 IST