वसई : नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी १७ वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्‍यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्‍याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या तरुणाची तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती. गुरुवारी २५ वर्षीय सोनू नामक तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.

हे ही वाचा… Maharashtra News Live : “आम्ही उद्या बंद पाळणारच”, संजय राऊतांची प्रतिक्रिया; इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलीची केवळ ४-५ दिवसांची ओळख होती. तिला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.