वसई: शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून तरुण मुलांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा आणि विरारमध्ये या घटना घडल्या आहेत. पहिली घटना नालासोपारा पूर्वीच्या शालिमार हॉटेल जवळ घडली. या ठिकाणी इम्पेरियल बिल्डर्स या विकासाचे बांधकाम चालू होते. तेथील लिफ्टला हात लागल्याने सनी शर्मा (१९) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुळींज कपोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना विरार येथे घडली आहे. विरार पूर्वेच्या नारंगी येथे धरती निवास येथे बोरिंगचा नळ चालू करत असताना प्लग वायरमधील विजेचा धक्का लागून वेदांत जैतापकर (१७) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी देखील नालासोपारा पूर्वेच्या गावराई पाडा येथे सोनी गुप्ता (४०) या महिलेचा घरातच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. आंबेचाळ येथे गुप्ता कुटुंबियांनी नवीन घर बांधले होते. त्या निमित्त पूजा ठेवली होती. यासाठी शेजारच्या घरातून बेकायदेशीर पणे वीज जोडणी घेतली होती. त्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने सोनी गुप्ता चा मृत्यू झाला होता. पेल्हार पोलिसांत या मृत्यू प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.